Type Here to Get Search Results !

अतिवृष्टी भरपाईतून बहुतेक गाव वंचित..

अतिवृष्टीच्या अनुदानात गावे वगळली

खरीप हंगाम २०२२ मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांश महसूल मंडळामध्ये‎ सरासरी पेक्षा अधिक पर्जन्यमान होवून‎ अतिवृष्टी झालेली आहे. परंतु अतिवृष्टी अनुदानात भरपाई देताना यातून वगळल्याने शेतकरी मदतीपासून‎ वंचित राहणार आहे.


खरीप हंगामात अतिवृष्टी होऊन अनेक फळबागा‎ व खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ होवून देखिल शासनाने जाणून बुजून अनेक गावांना वगळले असल्याने शेतकरी संतप्त झाले आहे.यामुळे राज्य सरकार विरोधात शेतकर्‍यांमध्ये नाराजीचे सुर उमटले असून येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सरकारला धडा शिकवू अशी शेतकर्‍यांची भावना आहे.

 सरकारने शेतकर्‍यांवर अन्याय केला आहे. त्यासाठी आंदोलन छेडण्यात येईल,‎ असा इशारा शेतकरी संघटनांनी देण्यात आला आहे.

Tags