Type Here to Get Search Results !

पॅन आणि आधार कार्ड लिंक कसे करावे, लिंक स्टेटस असे चेक करा...

PAN CARD-Aadhaar Link: प्राप्तिकर विभागाने पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक एकमेकांशी जोडण्यासाठी अंतिम दिनांक ३१ मार्च हा दिला आहे. त्यानंतर मात्र,यासाठी एक हजार रुपये शुल्क द्यावे लागणार आहे....


PAN CARD - Aadhaar Linking

मुंबई : ३१ मार्च ही तारीख जवळ येत आहे तसतशी पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करणाऱ्यांची धावपळ वाढली आहे. मागील आठवडाभरापासून शहरातील ई-सेवा केंद्रे तसेच इंटरनेट कॅफेवर पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी गर्दी दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आधारकार्ड आणि पॅनकार्ड लिंक करण्याची गरज आणि कसे करावे, हे आज आपण पाहूया.

पॅन-आधार कार्ड लिंक मुदत

दोन्ही क्रमांक एकमेकांशी ३१ मार्चपर्यंत जोडता येणार असले तरी त्यासाठी या क्रमांकांच्या वापरकर्त्याला एक हजार रुपये शुल्क किंवा दंड भरावा लागणार आहे. याआधी दोन्ही क्रमांक जोडण्यासाठी अंतिम दिनांक ३१ मार्च २०२२ हा होता. ३१ मार्च २०२३पर्यंत दोन्ही क्रमांक संलग्न न केल्यास त्यानंतर पॅन क्रमांक अकार्यरत होणार आहे.


शेअर बाजार नियंत्रक सेबीने सांगितले आहे की, ३१ मार्चनंतर या क्रमांकांच्या वापरकर्त्यांना मुंबई शेअर बाजार किंवा राष्ट्रीय शेअर बाजार येथे कोणताही व्यवहार करता येणार नाही. त्याचप्रमाणे या वापरकर्त्याच्या प्राप्तिकर विवरणपत्राची प्रक्रिया प्राप्कतिर विभाग पूर्ण करणार नाही.

आधार आणि पॅन कार्ड लिंक स्टेटस असे चेक करा 👇👇

- प्राप्तिकर विभागाच्या https://www.incometax.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.


-क्विक लिंक्स अंतर्गत लिंक आधार स्टेटस यावर क्लिक करा.


- पॅन व आधार क्रमांक भरा आणि व्ह्यू लिंक आधार स्टेटस वर क्लिक करा.


- हे दोन्ही कार्ड लिंक झालेले नसतील तर 

"PAN not linked with Aadhaar. Please click on the "Link Aadhaar" link to link your Aadhaar with PAN" हा संदेश दिसू लागेल.


- दोन्ही कार्ड झालेले असतील तर "Your Aadhaar is linked with PAN" हा संदेश दिसेल.


पॅन-आधार ऑनलाइन जोडणी काशी करावी 👇👇


केंद्र सरकारने आधार कार्ड संबंधी घेतला मोठा निर्णय, निवडणुकीआधीच दिली गोड बातमी


- प्राप्तिकर विवरण ऑनलाइन भरणा करण्यासाठी असलेल्या www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाइटवर जा.


- लिंक आधार वर क्लिक करा.


- तुमचा पॅन क्रमांक टाइप करा, आधार क्रमांक टाइप करा आणि आधार कार्डवर आहे त्याप्रमाणे तुमचे नाव व अन्य तपशील भरा.


- तुम्ही भरलेल्या तपशिलाची खात्री करा आणि सबमिट करा.


- जोडणी झाल्याचा संदेश स्क्रिनवर दिसू लागेल आणि एक ओटीपी तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर येईल.