Type Here to Get Search Results !

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 300 रुपये अनुदान

Maharashtra News: राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 300 रुपये सानुग्रह अनुदान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा


कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या, अशी मागणी विरोधकांची मागणी होती, नाशिक मधील शेतकर्‍यांनी थेट राजभवणार मोर्चा काढला आहे. कांदा उत्पादक शेकार्‍यांना सरकारने मदत करावी अशी त्यांची मागणी आहे.

budget session 2023  Maharashtra Cm Eknath Shinde declared ex-gratia  of Rs 300 per quintal for onions for onion producing farmers Maharashtra News:  राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 300 रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली

Onion Subsidy News 

 सध्या राज्यातील कांदा (Onion) उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. दरात घसरण झाल्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. राज्यात अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 300 रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज (13 मार्च) विधानसभेत केली. 

देशाच्या कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा  50 टक्के हिस्सा आहे.  देशातील इतर राज्यातील कांद्याचे उत्पादन वाढल्याने पुरवठ्याच्या प्रमाणात मागणी कमी आहे. त्यामुळे कांद्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे. कांदा हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नगदी पीक असून त्याला मिळणारा भाव कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील जिव्हाळ्याचा भाग आहे. कांदा नाशवंत पीक असल्याने त्याला किमान आधारभूत किंमत लागू करता येत नाही, असे एकनाथ शिंदे यांनी संगितले.

300 रुपये अनुदान हे तुटपुंजे, शेतकऱ्यांची प्रतिक्रिया

कांद्याला 300 नव्हे तर किमान 500 ते 600 रुपये अनुदान द्या, अशी  शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. कांद्याचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र घोषित केलेलं अनुदान तुटपुंजे आहे. काही शेतकऱ्यांना अनुदान दिले, काहींना नाही असे शासनाने करु नये. सरसकट सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने अनुदान द्यावे, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 300 नव्हे तर 500 रुपये द्या, अशी मागणी विरोधकांनी विधानसभेत मागणी केली आहे. या  मागणीसाठी विरोधकांनी सभात्याग केला आहे. 

Tags