Type Here to Get Search Results !

pmkisan योजना 2000 रु या दिवशी जमा होणार.

या दिवशी जमा होणार 2000 रुपये 


Pm Kisan News : पीएम किसान सन्मान निधी योजना यामध्ये आतापर्यंत 12 हफ्ते मिळाले असून 13 व हप्ता कधी जमा होणार याची तारीख फिक्स झाली आहे.

13 वा हप्ता कधी जमा होणार?

शेतकरी बांधव या योजनेच्या तेराव्या हप्त्याचे आतुरतेने वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत देशभरातील  शेतकरी बांधवांना 27 फेब्रुवारी 2023 दिवशी या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना तेरावा हफ्ता मिळणार आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या हस्ते कर्नाटक येथे एका कार्यक्रमात पीएम किसानच्या पात्र शेतकऱ्यांना दोन हजाराचा हप्ता सोडला जाणार आहे. दरम्यान या योजनेचा तेरावा हप्ता हा ज्या शेतकऱ्यांनी केव्हायसी केलेली आहे अशाच शेतकऱ्यांना मिळणार आहे. यामुळे तेराव्या हफ्त्यासाठी शेतकरी पात्र आहेत की नाही हे आधी चेक करणं महत्वाचं आहे.

पीएम किसानचा 13वा हप्ता मिळेल की नाही कसं चेक करणार? 👇👇

पीएम किसान योजनेचा हफ्ता मिळेल की नाही हे चेक करण्यासाठी https://pmkisan.gov.in/ या शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर वर जा. वेबसाईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करा. यानंतर एक पेज ओपन होईल. यासाठी ‘Search by Mobile number’ हा ऑप्शन निवडावा लागतो. त्यानंतरं नोंदणीकृत मोबाइल नंबर एंट्री करावा लागतो. यानंतर समोर इंटर इमेज टेक्स्ट दिसेल, ज्याच्या बॉक्समध्ये दिलेला इमेज कोड टाकावा लागणार आहे. यानंतर Get data वर क्लिक करावे लागते. यानंतर संबंधित शेतकऱ्याचं स्टेटस त्या ठिकाणी डिस्प्ले होते.