Type Here to Get Search Results !

एक वर्षासाठी साखर निर्यात बंदी...

 Sugar Export Ban | साखर निर्यात बंदी

केंद्र सरकारने साखरेच्यानिर्यातीबाबत (Sugar Export) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारनं साखरेच्या किंमती नियंत्रीत ठेवण्यासाठी निर्यातीवर एक वर्षासाठी बंदी घातली आहे.


ऑक्टोबर 2023 पर्यंत साखर निर्यातीवर बंदी

आता सध्या केंद्र सरकारनं 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. परकीय व्यापार महासंचालनालयाने (DGFT) आता एक वर्षासाठी मुदतवाढ देखील दिली आहे. आता 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत साखरेच्या निर्यातीवर बंदी असणार आहे. तसेच परकीय व्यापार महासंचालनालयाने एक अधिसूचना जारी करुन याबाबतची माहिती दिली (agriculture information) आहे. कच्च्या, शुद्ध आणि पांढर्‍या साखरेच्या निर्यातीवरील निर्बंध 31 ऑक्टोबर 2022 ते 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत वाढवण्यात आले आहेत.

2021 ते 2022 मध्ये 394 लाख टन साखरेचं उत्पादन

2021 ते 2022 दरम्यान, देशात साखर कारखान्यांनी सुमारे 3 हजार 574 लाख टन ऊसाचं गाळप करुन सुमारे 394 लाख टन साखरेचं उत्पादन केले. तसेच यापैकी 359 लाख टन साखर कारखान्यांनी तयार केली. तर 35 लाख टन साखर इथेनॉल निर्मितीसाठी वळवण्यात आल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. 

परंतु आता साखर निर्यात बंदीमुळे बाजारातील साखरेचे दर नियंत्रणात राहणार आहे.

Tags