Type Here to Get Search Results !

Pm kisan kyc साठी मिळणार मुदतवाढ.

केवायसी केली तरच मिळणार 2000 रुपये हप्ता



सर्व राज्यांच्या मागणीनुसार पीएम किसान योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ व्हावा याकरीता मुदतवाढ देण्यात येत आहे. pmkisan केवायसी करण्याची मुदत  पुन्हा 7 दिवस वाढली असून 14 सप्टेंबर 2022 पर्यन्त सर्व लाभार्थी यांनी केवायसी करावी. ज्या राज्यांची माहिती अद्ययावत असून त्यांनी 14 सप्टेंबर,2022 पर्यंत केंद्राला पाठवावी. तर उर्वरित राज्यांनी या कामास प्राधान्य देऊन 25 सप्टेंबर, 2022 पर्यंत माहिती संकलीत करुन या योजनेच्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेत समाविष्ठ करुन 30 सप्टेंबर, 2022 पर्यंत योजनेचे काम पूर्णत्वास नेण्याच्या सूचना तोमर यांनी संबंधित राज्यांच्या कृषी मंत्र्यांना दिल्या.

Pm kisan kyc साठी मिळणार मुदतवाढ, राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा

किसान सन्मान योजने करीता शेतकऱ्यांचा डाटा बेस तयार करण्याचे काम प्रगतीपथावर असून यासाठी केवायसीसाठी पाठपुरावा चालू असल्याचे सांगून कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, 11 लाख 39 लाभार्थ्यांचा डाटा अपलोड करण्यात आला आहे.

राज्यातील अधीकाधिक शेतकऱ्यांना या योजनेच्या लाभाकरीता समाविष्ट करण्याचे उद्दीष्ट असून केंद्र शासनाने मुदतवाढ दिल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ही मागणी केंद्रीय कृषी मंत्री तोमर यांनी तत्काळ मंजूर केली.

गाव पातळीवर मोहीम राबवणार

राज्यातील पात्र पीएम किसान लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी ग्राम पातळीवर मोहिम राबविली जात असून आजवरच्या कालावधीमध्ये 4 लाख 42 हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यात आले आहे. 

ट्रॅक्टर लाभार्थी लॉटरी 👉महा डीबीटी लाभार्थी यादी 
पीएम किसान योजना 👉लाभार्थी पात्र यादी
महा डीबीटी लॉटरी 2022 👉लॉटरी येथे क्लिक करा
प्रधानमंत्री आवास योजना 👉घरकुल मंजूर यादी येथे पहा

उर्वरीत 39 लाख 13 हजार लाभार्थ्यांना प्रसार प्रसिध्दीद्वारे प्रत्यक्ष संपर्क करुन त्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण 100 टक्के करुन घेत असल्याची माहिती यावेळी यांनी बैठकीत दिली.

Tags