Realme 9I 5G Smartphone
Realme Smartphone : रिअलमी या कंपनीने भारतात नवा स्मार्टफोन (Realme Smartphone) लॉंच करण्याची तयारी केली असून खुद्द कंपनीद्वारेच ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटवर त्याची माहिती शेअर करण्यात आली आहे. कंपनीने दरवेळेस आपल्या फोनमध्ये ग्राहकांना काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न केला आहे. रिअलमीच्या या नव्या फोनचे नाव रिअलमी 9 आय 5जी (Realme 9I 5G) असे असेल. विशेष म्हणजे हा फोन 15 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध होऊ शकेल.
कधी मार्केट मध्ये येणार
या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 810 चिपसेटचा वापर करण्यात येईल. येत्या 18 ऑगस्ट रोजी दुपारी 11.30 वाजता हा फोन लॉंच होणार आहे. रिअलमी 9 आय हा स्मार्टफोन जानेवारी 2022मध्ये स्नॅपड्रगन 680 चिपसेटसह आला होता. मात्र आता 5 जी क्षमता वाढवण्यासाठी कंपनीने या फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी प्रोसेसरचा वापर केला आहे. या फोनमध्ये बॅक पॅनेलवर कंपनीने ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
बायोमॅट्रिक अनलॉक सिस्टीम
या फोनमध्ये अनेक फीचर्स असून मागच्या बाजूस असणाऱ्या पॅनेलवर पॉवर बटन देण्यात आले आहे. त्यावर कंपनीद्वारे फिंगरप्रिंट स्कॅनर बसवण्यात आले असून, त्यामुळे बायोमॅट्रिक पद्धतीने मोबाईल अनलॉक करता येतो.