Type Here to Get Search Results !

राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय, या भागात होणार मुसळधार पाऊस...

राज्यात होणार मुसळधार पाऊस


राज्यात दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रीय होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून काही ठिकाणी तुरळक पाऊस पडत आहे. दोन दिवसांपासून पुन्हा काही ठिकाणी पाऊस सक्रीय झाला आहे. आता हा पाऊस पुढील काही दिवसांपासून सक्रीय (Rain updates In Maharashtra) होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.

वातावरणातील बदलांमुळे पुढील चार दिवस राज्यातील विविध भागात पाऊस होणार आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना शुक्रवारी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे येत्या 6 व 7 रोजी कोकण, गोव्यासह   काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक आणि अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

या भागात पावसाची शक्यता

राज्यात चार ऑगस्ट रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा,कोल्हापूर, पाच ऑगस्ट रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया येथे चांगला पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. सहा ऑगस्ट रोजी मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे तर सात रोजी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड पुणे, नाशिक या भागात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

भाजीपाला दर भडकले

 (Nashik Market) नाशकात मात्र सतंतधार सुरुच आहे. त्यामुळे आतापर्यंत खरीप हंगामातील पिकांचे तर नुकसान झालेच आहे पण आता (Vegetable Rate) भाजीपालाही पाण्यातच अशी अवस्था आहे. उत्पादनात घट अन् बाजारपेठेत मागणी यामुळे भाजीपाल्याचे दर 30 ते 40 टक्क्यांनी वाढत आहेत. निसर्गाच्या लहरीपणातून यंदा कोणत्याच पिकाची सुटका झालेली नाही. आतापर्यंतच्या पावसामुळे राज्यातील 10 लाख हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले असताना आता भाजीपाल्याच्या उत्पादनातही मोठी घट होत आहे. 

पावसाचा परिणाम एका विशिष्ट भाजीपाल्यावर नाहीतर सर्वच भाजीपाल्यावर झाला आहे.  शिवाय पावसामुळे नव्या भाजीपाल्याची लागवडही करणे शक्य़ नाही. त्यामुळे भविष्यात दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कोथिंबीर,शिमला मिरची,गिलके,दोडके,वांगे,कोबी अशा सर्वच भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भाव वाढ झाल्याचं नाशिकच्या बाजार समितीत दिसून येत आहे.

Tags