How Downlod EPIC voter Card
मतदान ओळखपत्र हे खूप महत्वाचे सरकारी ओळखपत्र आहे. तुमचे मतदान ओळखपत्र हरवले असेल किंवा तुम्हाला नवीन ओळखपत्र हवे असेल तर तुम्ही लगेच मोबाइल वर डाउनलोड करू शकता.
ऑनलाइन मतदान EPIC कार्ड
नवी दिल्ली : आधार कार्डप्रमाणेच मतदान ओळखपत्र देखील महत्त्वाचे कागदपत्र आहे. अनेक सरकारी कामांसाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता. याशिवाय मतदानासाठी देखील ते आवश्यक आहेच. तुमचे मतदान ओळखपत्र हरवले असेल व तुम्हाला त्याची त्वरित गरज असल्यास काळजी करण्याचे गरज नाही.
मतदान आयडी-कार्ड (e-EPIC) ची सुविधा सुरू झाली आहे. या सुविधेद्वारे तुम्ही अवघ्या काही मिनिटात सहज डिजिटल मतदान ओळखपत्र डाउनलोड करू शकता. ही सेवा २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने सुरू करण्यात आली होती.
e-EPIC कार्ड म्हणजे काय ?
e-EPIC चे एक सुरक्षित डिजिटल डॉक्यूमेंट फॉर्मेट (पीडीएफ) आहे, जे मोबाइल अथवा कॉम्प्यूटरवर डाउनलोड करू शकता. हे ओळखपत्र मोबाइलवर देखील स्टोर करू शकता किंवा डिजी लॉकरमध्ये पीडीएफ स्वरूपात अपलोड करता येईल. याची प्रिंट देखील तुम्ही काढू शकता.
डिजिटल मतदान कार्ड असे डाउनलोड करा 👇👇
सर्वात आधी निवडणूक आयोगाची वेबसाइट https://voterportal.eci.gov.in वर जा.
येथे NVSP च्या https://www.nvsp.in/Accou nt/Login या लॉगइन पेजवर जावे लागेल.
लॉगइन करण्यासाठी तुमचे अकाउंट असणे गरजेचे आहे.
जर तुमचे अकाउंट नसेल तर ईमेल आयडी अथवा मोबाइल नंबरद्वारे अकाउंट तयार करू शकता.
अकाउंट उघडल्यानंतर काही डिटेल्स भरून लॉगइन करू शकता.
लॉगइन केल्यानंतर e-EPIC डाउनलोडचा पर्याय दिसेल.
डाउनलोडच्या पर्यायावर क्लिक करून तुम्ही सहज पीडीएफ फाइल डाउनलोड करू शकता.