Type Here to Get Search Results !

गणपती बाप्पाची स्थापना आणि पुजा शुभमुहर्त...सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाच्या ( Ganeshpuja 2022) आगमन हा अत्यंत आनंदाचा दिवस असतो. आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. आज प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पा विराजमान होणार आहे. पंचांगाप्रमाणे गणपती प्रतिष्ठापना करण्याचा मुहूर्त पहाटे पावणे पाचपासून  दुपारी दोनपर्यंत  प्रसिद्ध दाते पंचागचे प्रमुख मोहन दाते यांनी दिली आहे.

श्री गणेश प्राणप्रतिष्ठा शुभमुहूर्त

मागच्या वर्षी 10 सप्टेंबरला गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. ती यंदा 31 ऑगस्टला होणार आहे. ही स्थापना करताना आपण साधारणतः ब्राह्म मुहूर्तापासून म्हणजे पहाटे पावणे पाचपासून मध्यानकाळ संपेपर्यंत म्हणजे दुपारी दोनपर्यंत आपल्या सोयीने कोणत्याही वेळी करू शकता. त्यासाठी वेगळे विशेष कोणतेही मुहूर्त पाहण्याची गरज नाही. घरातली सकाळची पूजा झाली की, त्यानंतर गणरायची उत्साहात स्थापना करावी. ज्यांच्याकडे जितक्या दिवसचा गणपती आहे त्यांनी त्याप्रमाणे सकाळी पूजा आणि संध्याकाळी आरती करावी.