Type Here to Get Search Results !

आणखी तीन ते चार दिवस पावसाचा जोर कायम

 राज्यात मुसळधार पाऊस सुरूराज्यात विविध ठिकाणी चांगलाच पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईसह, ठणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापुरात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. 

राज्यात पुढील चार ते पाच दिवस राज्यात पावसाचा जोर असाच कायम राहणार आहे. काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढला आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणात घाट माथ्यावर  मुसळधार पाऊस चालू आहे. रविवारी मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

मुंबई शहरात पावसाच्या काही सरी बरसत आहे, उपनगर व सभोवतालच्या नवी मुंबई, ठाणे, उरण-पनवेल भागात पावसाची संततधार चालू आहे. राज्यात गेल्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार सरींची नोंद झाली. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत जोरदार सरींमुळे महाबळेश्वर आणि वर्धा येथे १०० मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली.

 

Maharashtra Rain update


  राज्याच्या विविध भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकरी आनंदी असल्याचे दिसत आहे. राज्यातील मुंबईसह, ठणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,पुणे सातारा, कोल्हापुरात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यातही चांगला पाऊस सुरु असल्याचं दिसत आहे. मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड या जिल्ह्यात काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळं नदी नाले धुथडी भरुन वाहत असल्याचं चित्र दिसत आहे. तसेच कोकणात देखील चांगला पाऊस पडत आहे.

परिणामी येत्या बुधवारपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. घाट परिसरात ही पावसाच्या दमदार हजेरीमुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामानशास्त्र विभागाने केले आहे.