Type Here to Get Search Results !

ग्रामपंचायत कर्मचारी वेतन वाढ लागू

ग्रामपंचायत कर्मचारी वेतनवाढमहाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 61 प्रमाणे ग्रामपंचायतीला त्यांच्या आवश्यकतेनुसार कर्मचारी नेमण्याचे व त्यांचे वेतन ठरवण्याचे अधिकार आहे सध्या या विभागाच्या 10 ऑगस्ट 2020 च्या परिपत्रकानुसार 2013 च्या दिशेने मधील तरतुदी लागू करून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करण्यात आलेले आहे.

उद्योग ऊर्जा व कामगार विभागाकडून किमान वेतन अधिनियम 1948 च्या तरतुदींना अनुसरून महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामपंचायत कामधंदा या रोजगारात असणाऱ्या कामगारांना देय असलेल्या किमान वेतन दर शासन अधिसूचनेद्वारे पुनर निर्धारित केले जातात.


 आणि याच अनुषंगाने 10 ऑगस्ट 2020 रोजी उद्योग ऊर्जा व कामगार विभागाने सुधारित अधिसूचना निर्गमित केले आहे त्यानुसार उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या दिनांक 10 ऑगस्ट 2020 च्या आधी सूचनेला अनुसरून सुधारित दर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेले आहेत.याच्यासाठी 22 जून 2022 रोजी एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.


शासन निर्णयानुसार उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या 10 ऑगस्ट 2020 रोजी च्या आधी सूचनेला अनुसरून वेतन निश्चित करण्यात आलेला आहे जे वेतन या कर्मचाऱ्यांना 01 april 2022 पासून लागू करण्यात येणार आहे याच्यासाठी 


ग्रामपंचायत कर्मचारी वेतनवाढ किती ?

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन दर लागू केल्यानंतर ग्रामपंचायतच्या लोकसंख्येनुसार कुशल / अर्धकुशल / अकुशल / असे 3 टप्पे करण्यात आहे असून असा मिळणार पगार….

परिमंडळ – 1 : 10,000 पेक्षा अधिक लोकसंख्या  :-

कुशल कामगार :- 14,125 रुपये
अर्धकुशल कामगार :-13,420 रुपये
अकुशल कामगार :- 13,085 रुपये

परिमंडळ – 2 : 5,000 ते 10,000 लोकसंख्या  :-

कुशल कामगार :- 13,760 रुपये
अर्धकुशल कामगार :-13,055 रुपये
अकुशल कामगार :- 12,715 रुपये

परिमंडळ – 3 : 5,000 पर्यन्त लोकसंख्या  :-

कुशल कामगार :- 12,665 रुपये
अर्धकुशल कामगार :-11,960 रुपये
अकुशल कामगार :- 11,625 रुपये

कर्मचाऱ्यांना एप्रिल 2022 पासून हे किमान वेतन दर लागू करण्यात आले आहे.

Tags