Type Here to Get Search Results !

अहमदनगर जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा किती झाला पहा.

मुळा , भंडारदरा , जायकवाडी धरण पाणीसाठा 2022


जायकवाडी जलाशयाचा साठा 90 टक्क्यांच्या पुढे

जायकवाडीत काल सायंकाळी 7 वाजता 33 हजार 647 क्युसेकने नविन पाणी दाखल होत होते. याच वेळी या धरणातुन 30435 क्युसेकने विसर्ग करण्यात येत होता. हे धरण 92.47 टक्के भरले होते. दरम्यान नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातुन जायकवाडीच्या दिशेने काल रात्री 8 वाजता 9465 क्युसेकने विसर्ग करण्यात येत होता.

जायकवाडी जलाशयाचा साठा 90 टक्क्यांच्या पुढे गेल्याने धरण प्रशासनाने विसर्ग करण्याचा निर्णय घेतला. सोमवारी सायंकाळी 6 वाजे नंतर या धरणाच्या 18 दरवाज्यातुन विसर्ग करण्यास सुरुवात झाली. सुरुवातील 9432 क्युसेक विसर्ग करण्यास सुरुवात झाली. तो वाढवत काल मंगळवारी रात्री 7 वाजता हा विसर्ग क्रमाक्रमाने वाढवत 30435 क्युसेक इतका करण्यात आला. यासाठी 10 ते 27 क्रमांकाचे दरवाजे उचलण्यात आले आहेत. या धरणात काल सायंकाळी 7 वाजता 92.47 टक्के इतका पाणी साठा झाला होता. 70.9 टिएमसी उपयुक्त पाणीसाठा या धरणात तयार झाला होता

भंडारदरा धरण 90 % भरले; पाण्याचा विसर्ग प्रवारा नदीपात्रात सुरु

भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या १५ दिवसांपासून पाऊस सुरु आहे. धो धो पडत असलेल्या पावसामुळे ओढे नाले भरून वाहत आहेत. धरणाच्या पातळीत वाढ होत असुन आज धरण 90 % भरले आहे. भंडारदरा धरणाची पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी भंडारदरा जलाशयातून 3500 क्युसेक पाणी प्रवरा नदीपात्राव्दारे निळवंडे धरणात सोडण्यात आले आहे. 


निळवंडे धरण ही 82.44 टक्के भरले आहे. यातुनही प्रवारा नदिमार्गे हे पाणी जायकवाडी धरणाकडे झेपवलेले आहे. त्यामुळे यंदा भंडारदरा धरण हे दरवर्षी प्रमाने १५ ऑगस्टला न भरता अगोदरच जुलै महिन्याच्या शेवटी भरण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रवरा नदीपात्राच्या आसपासच्या गावांनी काळजी घ्यावी असे आव्हान जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे.सोमवारी सायंकाळी सहा वाजता भंडारदरा धरणातून प्रवरा नदी पात्रात ६ हजार ९९२, निळवंडे धरणातून ५ हजार ६१२, ओझर बंधाऱ्यातून ६ हजार ३२९, नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदी पात्रात २९ हजार ७७६, भीमा नदी पात्रात १४ हजार ९६२,घोड नदीत २ हजार ८० क्यूसेसने पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

मुळा धरण पाणीसाठा अपडेट

नगर जिल्ह्यातील धरणांच्या लाभक्षेत्रात कमी अधिक प्रमाणात पावसाचा जोर कायम आहे. आज  मुळा धरण हे 75 टक्के भरले असून अजूनही धरणात आवक सुरू आहे. कोतूळ पांजरे आणि हरीचंद्र गड भागात पर्जन्यवृष्टी सुरू आहे.

राज्यभरात पुढील 2 दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिवाय, राज्यातील 18 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार, पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या 18 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Tags