Type Here to Get Search Results !

मविआ सरकार धोक्यात, कोंग्रेसचे 25 आमदार नाराज.

 ठाकरे सरकार येणार धोक्यात, 25 आमदार नाराज.महाविकास आघाडी सरकारला (maha government) अडीच वर्ष पूर्ण झाली आहे. एकीकडे भाजपचे नेते सरकार पाडण्याचा मुहूर्त देत आहे. पण आता ठाकरे सरकारसाठी एक डोकेदुखी समोर येत आहे.

काँग्रेसचे आमदार महाविकास आघाडी सरकारवर नाराज असल्याचे वृत्त समोर आले आहे. काँग्रेसच्या 25 आमदारांनी नाराजी व्यक्त केली असून पक्षाध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) यांच्या भेटीसाठी वेळ मागितला आहे.

कोंग्रेस चे आमदार नाराज

महाविकास आघाडी सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. अलीकडेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारांनी निधी देण्याबाबत घोषणा केली आहे. पण तरीही, काँग्रेसच्या आमदार अजूनही नाराज आहे.
काँग्रेसचे 25 आमदार सरकारवर नाराज आहे. आपल्या व्यथा मांडण्यासाठी त्यांनी थेट एक पत्रही सोनिया गांधींना लिहिण्यात आले आहे, असं वृत्त एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने दिलं आहे.

तसंच, पक्षामध्ये समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. काँग्रेसचे मंत्री योग्य प्रकार आपली भूमिका मांडत नाही. प्रत्येक मंत्र्यांची आपल्या आमदारांची भूमिका मांडण्याची जबाबदारी आहे, पण ते कमी पडत आहे.

आता महाविकास आघाडी सरकार या सर्व आमदारांची नाराजी दूर कशी करणार की, ठाकरे सरकार धोक्यात येणार हे येणारा काळच सांगणार आहे.

Tags