Type Here to Get Search Results !

शेतकर्‍यांना देणार 50000 रुपये अनुदान, यासह अजित पवार यांनी आणखी काय घोषणा केल्या पहा सविस्तर.

 महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प 2022

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी त्यांनी कृषि, आरोग्य, शिक्षण, परिवहन यासह अनेक घोषणा केल्या.



Maharshtra Budget 2022

राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये कृषि क्षेत्रासाठी काय घोषणा 👇👇

भूविकास बँकांचे  964 कोटी रुपयांचे कर्ज शेतकर्‍यांकडे होते, ते माफ करण्याची मोठी घोषणा अजित पवार यांनी केली.

त्याचबरोबर पंतप्रधान पीक विमा योजनेत काही बदल करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यामध्ये जर बदल केले नाहीत, तर शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकार अन्य पर्यायांचा विचार करेल असे यावेळी अजित पवार यांनी सांगितले.

अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेल्या काही महत्त्वाच्या घोषणा खाली पहा 👇👇

  • हिंगोलीमध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारणार.
  • शेतकरी कल्याण योजनेसाठी अधिक अनुदान देण्यात येणार असल्याचे सांगितले.
  • नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता 2022-23 यावर्षी 50 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.
  • शेतकऱ्यांना शेततळे योजनेसाठी 50 हजार एवेजी ते वाढवून आता 75 हजार रुपये अनुदान देण्यात येणार
  • दोन वर्षात 104 सिंचन प्रकल्प पूर्ण करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली.
  • त्याशिवाय गोसीखुर्द प्रकल्पासाठीच्या कामासाठी निधीची तरतूद करण्यात आली.
  • कोकण आणि परभणी कृषी विद्यापीठाला 50 कोटी रुपये निधी देण्याची घोषणा अजित पवार यांनी केली.
  • पंतप्रधान सिंचन योजनेतून 11 प्रकल्प पूर्ण करणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
  • जलसंपदा विभागाला 13 हजार 252 कोटी रुपयांच्या निधीची तरतदू यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
  • देशी गाई, बैलांची उत्पादकता वाढवण्यासाठी राज्यात तीन मोबाइल प्रयोगशाळा राज्यभरात उभारणार
  • प्रत्येक महसूल विभागात प्रत्येकी एक शेळी प्रकल्प सुरू करणार.
  • या वर्षात 60 हजार कृषीपंपाना वीज देणार
  • एक लाख हेक्टर क्षेत्रावर फळबागा उभारण्याचे लक्ष्यं आहे.
  • मुंबईतील पशूवैद्यकीय महाविद्यालयाला 10 कोटींचा निधी

शिक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पामध्ये केलेल्या घोषणा 👇👇

  • उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी 1160 कोटींच्या निधीची तरतूद केली आहे.
  •  शालेय शिक्षण विभागासाठी 2354 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली
  • मुंबईतील पशुवैद्यकीय महाविद्यालयाला 10 कोटींचा निधी देण्यात येणार
  • सांस्कृतिक विभागासाठी 193 कोटींच्या निधीची तरतूद आहे
  •  क्रीडा विभागासाठी 354 कोटींच्या निधीची तरतूद केली आहे

अर्थसंकल्पात राज्यातील परिवहन क्षेत्रासाठीच्या घोषणा 👇👇

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना राज्यात परिवहन, वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.

  • यामध्ये समृद्धी महामार्गाचा गडचिरोली, गोंदियापर्यंत विस्तार करण्यात येणार असून मुंबईला जलवाहतुकीशी जोडण्यासाठीच्या प्रकल्पांची घोषणा करण्यात आली.
  • मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा विस्तार गोंदिया, गडचिरोलीपर्यंत करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली
  • गडचिरोलीत नवीन विमानतळ उभारणार असल्याची महत्त्वाची घोषणा
  • मुंबई शिवडी- न्हावा शेवा सागरी सेतू २०२३ च्या अखेरीस सुरू होणार
  • एसटी महामंडळाला एक हजार नवीन बसेस देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
  •  शिर्डी विमानतळाला १५० कोटींच्या निधीची तरतूद, तर रत्नागिरी विमानतळासाठी १०० कोटींच्या निधीची तरतूद
  • मुंबई ते हैदराबाद बुलेट ट्रेनसाठी केंद्राकडे पाठपुरवठा करणार असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटले.
  •  पर्यावरण पूरक ३ हजार बस सुरू करणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले.
  •  राज्यात ई-वाहनांसाठी ५००० ई-चार्जिंग स्टेशन उभारणार असल्याचे त्यांनी म्हटले. राज्यात इलेक्ट्रीक वाहनांचा भविष्यातील वाढणारा वापर पाहता हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे
  •  मुंबई महानगर क्षेत्राला जलमार्गाने जोडण्याचा उद्देश असल्याचे अजित पवार यांनी सांगितले
  •  परिवहन विभागाला ३ हजार ३०३ कोटींचा निधी देण्यात येणार आहे.
  •  पुणे रिंग रोडसाठी १५०० कोटींचा निधी प्रस्तावित

  • राज्याच्या अर्थसंकल्पामधील दहा महत्वाच्या घोषणा पहा 👇👇

  • राज्यातील 16 जिल्ह्यात प्रत्येकी 100 खाटांचे स्त्री रोग रुग्णालय
  • जलसंपदा विभागासाठी 13252 कोटींचा निधी देण्यात येणार
  • नवीन मागासवर्ग समर्पित आयोग स्थापन करणार
  • तृतीय पंथीयांना स्वतंत्र ओळखपत्र आणि रेशन कार्ड उपलब्ध करून देणार
  • आरोग्य विभागासाठी 11 हजार कोटींची भरीव तरतूद करण्यात आली
  • आंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मोबाईल सेवा पुरवणार
  • मुंबई प्रमाणे राज्यात एसआरएसाठी 100 कोटी रुपयांचा निधी
  • राज्यात रस्ते बांधण्यासाठी 15 हजार 773 कोटी रुपये निधि देणार
  • एसटी महामंडळाला 3 हजार नवीन बस देणार आहेत
  • महिला शेतकऱ्यांसाठीची 30 टक्केची तरतूद वाढवून 50 टक्के केली
  • कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रूपये प्रोत्साहनपर देणार
Tags