Type Here to Get Search Results !

एकापेक्षा जास्त बँकमध्ये असेल खाते तर, तुमचे पण होईल आर्थिक नुकसान वाचा.

 एकापेक्षा जास्त बँकेत खाते असेल तर होईल नुकसान



आजकाल आपण सर्वच आर्थिक व्यवहार बँक खात्यावरून करतो. त्यासाठी आपल्याला बँक खाते आवश्यक आहे. आर्थिक सुरक्षितता म्हणून बँक खात्यांमध्ये नागरिक पैशांची बचत करतात. पण बऱ्याचदा एकाच व्यक्तीची एकापेक्षा जास्त बँक खाती असतात. यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ शकते.

काय होईल नुकसान ते पहा ?

एकाहून अधिक बँकांमध्ये खाती असतील तर प्रत्येक खात्यासाठी वेगवेगळे शुल्क भरावे लागते. यामध्ये मेंटेनन्स चार्जेस, डेबिट कार्ड चार्जेस, एसएमएस चार्ज, सर्व्हिस चार्ज, मिनिमम बॅलन्स चार्ज इत्यादींचा समावेश होतो. एकाच बँक खात्यात आपल्या कमाईची माहिती उपलब्ध नसेल तर कर रिटर्न भरणे अवघड होते. विविध बँक खाती असतील तर हिशोब करणे अवघड होऊन जाते.अशा वेळी कर विभाग (Incometax department) तुम्हाला नोटिस बजावू शकतो. यावर उपाय म्हणून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नव्या अर्थसंकल्पात उपाययोजना केली आहे.

तुमची जास्त खाती असतील तर हे वाचा 👇👇

चालू खात्यात वर्षभर कोणताही व्यवहार न केल्यास ते निष्क्रिय खात्यात बदलते. यामुळे आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता वाढते. अशावेळी फक्त खाते सूरू ठेवण्यासाठी आपला भरपूर खर्च होतो आणि याचा परिणाम थेट तुमच्या गुंतवणुकीवर ( Investment) होतो.हेच पैसे तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवले तर याचा चांगला परतावा मिळू शकतो.