Type Here to Get Search Results !

31 मार्च पूर्वी हे काम करा अन्यथा तुमचे रेशनकार्ड रद्द होईल

 Adhar Card and Ration Card Link

 सध्या अनेक राज्यांमध्ये one nation one ration antargat नावनोंदणीचे काम सुरू आहे. त्यासाठी आपले आधार कार्ड हे रेशन कार्डला लिंक करणे गरजेचे आहे. आणि हे काम अद्याप अपूर्ण असल्याने सरकारकडून देण्यात आलेली 31 मार्च ही अंतिम मुदत आता 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. ज्यांनी अद्याप आपले रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक (Link) केलेले नाही त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे (Ration card Aadhaar link). सरकारने ही दोन्ही कागदपत्रे जोडण्यासाठी आता वाढीव मुदत दिली आहे.

30 जून पूर्वी रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करून घ्या.

यापूर्वी सरकारने जाहीर केले होते की, दोन्ही पेपर 31 मार्चपर्यंत जोडणे अत्यावश्यक आहे. मात्र याबाबत शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार आता हे काम 30 जूनपर्यंत करता येणार आहे.

आधार कार्डला जोडण्याचे फायदे काय ?

ज्या काळापासून सरकारकडून रेशनकार्ड ‘युनिव्हर्सल’ किंवा वन नेशन-वन रेशन कार्ड (One Nation-One Ration card) म्हणून जाहीर करण्यात आले तेव्हापासून ते आधार कार्डला जोडण्यासाठी महत्व देण्यात आले होते. हे कार्ड आधारशी लिंक करण्याबरोबरच भ्रष्टाचार आणि अनियमिततेला आळा घालण्यासाठी ही तयारी करण्यात आली आहे. विशेषत: राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत, स्थलांतरित लोकसंख्येसाठी, जे त्यांच्या तात्पुरत्या कामाच्या ठिकाणी रेशनपासून वंचित आहेत, त्यांच्यासाठी आधार कार्ड रेशनकार्डशी लिंक करणे महत्त्वाचे आहे. दोन्ही पेपर तुमच्याकडून जोडण्यात आले तर तुम्ही कुठूनही या रेशनचा लाभ घेऊ शकणार आहात.

एक देश एक शिधापत्रिका

सरकारने 2019 मध्ये वन नेशन-वन रेशन कार्ड योजना सुरू केली होती. त्यापाठीमागे सगळ्या देशात फक्त एकच शिधापत्रिका नियमित करणे हा या योजनेचा उद्देश आहे. त्यामुळे रेशनकार्ड कोणत्या राज्यात बनवले आहे, याचा कोणताही फरक यावर पडणार नाही. हे रेशनकार्ड एकादा आधारशी लिंक झाले तर हे रेशनकार्ड कुठेही वैध असणार आहे. कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराला यामध्ये वाव नसणार. याबाबत कोणताही भ्रष्टाचार होऊ नये यासाठीच याचे सर्व काम डिजिटल पद्धतीने केले जात आहे.

वास्तविक, रोजंदारी मजूर, स्थलांतरित मजूर किंवा घरापासून दूर इतर कोणत्याही राज्यात काम करणारे नागरिक रेशनपासून वंचित राहू नये यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. अशा लोकांनाही सवलतीच्या दरात रेशन मिळावे यासाठी एक राष्ट्र-एक शिधापत्रिका योजना सुरू करण्यात आली आहे.

आधार लिंक करणेचे अंतिम तारीख 30 जून

वन नेशन वन रेशन कार्ड या योजनेअंतर्गत 80 कोटी नागरिकांना याचा लाभ मिळत आहे. या वर्षी फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत रेशनच्या लाभार्थ्यांपैकी 96 टक्के लाभार्थ्यांनी एक राष्ट्र-एक रेशन कार्ड योजनेत स्वतःचा समावेश केला आहे. सध्या अनेक राज्यांमध्ये नावनोंदणीचे काम सुरू असल्याने आणि हे काम अद्याप अपूर्ण असल्याने सरकारने 31 मार्च ही अंतिम तारीख 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.

यापूर्वी 31 डिसेंबर 2021 ही अंतिम मुदत 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली होती आणि आता ती 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.