Type Here to Get Search Results !

कांदाचाळ अनुदान योजना पात्रता , कागदपत्रे, ऑनलाइन अर्ज

Kanda Chal Anudan Yojana 


कांदा पीक उत्पादनात भारताचा जगात दूसरा क्रमांक लागतो.महाराष्ट्रात कांदा पिकाची लागवड मुख्यत्वे करुन नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, बुलढाणा, जळगाव व धुळे या जिल्ह्यात केली जाते. महाराष्ट्रात कांदा पिकाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. परंतु कांदा हा नाशवंत शेतमाळअसल्याने कांदा दिर्घकाळ टिकविणे शक्य होत नाही यासाठी कांदा चाळीच्या माध्यमातून साठवणूक करणे आवश्यक असते. 
कांदा चाळ बनविण्यासाठी शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून अनुदान दिले जाते त्यासाठी kanda chal anudan yojana  योजना ही कृषि विभागामार्फत राबविली जाते.

शेतकऱ्यांना या योजनेत 5,10,15,20,25 व 50 मेट्रिक टन क्षमतेच्या कांदाचाळी साठी अनुदानाचा लाभ दिला जातो. 
यासाठी शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर कांदा  पिकाची  नोंद असणे बंधनकारक आहे.


Kandachal Anudan yojana 2022

 1. कादाचाळीचे बांधकाम विहीत आराखड्याप्रमाणे असणे बंधनकारक.
 2. 5,10,15,20,25 व 50 मे.टन क्षमतेच्या कांदा चाळींना अनुदान लाभ.
 3. कांदा पिकाखालील क्षेत्राची 7/12 उताऱ्यावर नोंद असणे आवश्यक.
 4. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर विहीत नमुन्यात प्रस्ताव संबंधित
  कृषि विभागाकडे द्यावा.
 5. वैयक्तिक शेतकऱ्यास 100 मे.टन तर सहकारी संस्थांसाठी 500 मे.टन चाळी बांधण्याची तरतुद.

कांदाचाळ अनुदान साठी अर्ज कसा करावा ?

पणन मंडळाचे मुख्यालय/विभागिय कार्यालय /जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था किंवा कृषि उत्पन्न बाजार समित्या.

 कांदाचाळीसाठी mahadbt च्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर लॉटरी ने लाभर्थ्यांचीनिवड कडून कांदाचाळ बांधण्यासाठी पूर्वसंमती दिली जाते.कांदाचाळ अनुदान योजनाअटी व पात्रता

 • ५ ते ५० मेट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळसाठी १ हेक्‍टर पर्यंत क्षेत्र तर ५० ते १०० मेट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळीसाठी १ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असावे.
 • अर्जदाराच्या नावे स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक कांदा पिकाची नोंद असणारा सातबारा उताराची प्रत व ८ अ उतारा हा महाडीबीटी पोर्टल उपलोड करावा लागतो. 
 •  (महाडीबीटी पोर्टल ऑनलाइन पद्धतीने कांद्याचा अनुदान घेण्यासाठी अर्ज आहे. यामध्ये आपल्याला ऑनलाईन पद्धतीने ची सोडत होणार असून. निरीक्षक आपले कृषी अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील हे आपल्या थेट शेतामध्ये येऊन पाहणी करतील.
 •  कृषी विभागाकडून अनुदान न घेतल्याचा दाखला देखील आपल्याला जोडावा लागणार आहे.
 • त्याचबरोबर काम झाल्यानंतर जिओ टॅगिंग ने अर्जदाराचा कांदाचाळी चा फोटो देखील आपल्याला जोडावे लागणार आहे.
 • सदर योजनेतुन पती किंवा पत्नी यापैकी एका सदस्याला अनुदानाचा लाभ घेता येणार आहे.
 • .