Type Here to Get Search Results !

अहमदनगर जिल्ह्यात जनावरांचे सर्व आठवडा बाजार बंद

आजपासून अहमदनगर जिल्ह्यात जनावरांचे आठवडा बाजार बंद

nagar-athavada-bajar-band

अहमदनगर जिल्ह्यात कोरोंना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. तसेच जनावरांचे आठवडा बाजारात आजारी आणि संक्रमित जनावरे जमा होतात. निरोगी जनावरांमध्ये लाळ खुरकत रोगाचा प्रादुर्भाव होऊन सदर रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होऊन अनेक जनावरे मृत्यूमुखी पडण्याची दाट शक्यता आहे.  ही बाब लक्षात घेऊन नगरचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यातील सर्व जनावरांचे आठवडा बाजार बंद केले आहेत. (Ahmednagar collector)

आज दिनांक 08/10/2021 रोजी तसा आदेश काढला असून पुढील आदेश येईपर्यंत खालील जनावरांचे आठवडा बाजार बंद राहणार आहे

नगर - वाळकी 
नेवसा- घोडेगाव
राहता- लोणी
श्रीगोंदा- काष्टी
कर्जत - राशीन
जामखेड - जामखेड 
संगमनेर - संगमनेर

हे पण वाचा
Tags