Type Here to Get Search Results !

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना 122 कोटी रु निधि झाला मंजूर

 Compensation will be given to the farmers affected by heavy rains

 अतिवृष्टी ग्रस्त शेतकर्‍यांना मिळणार नुकसान भरपाई.


अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना किती  निधि मंजूर झाला?


अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकरी मदतीच्या आशेने वाट पाहत आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय ६ ऑक्टोबर २०२१ रोजी बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या (State Cabinet) बैठकीत दोन शासन निर्णय घेण्यात आले. 
  1.  मार्च ते मे दरम्यान झालेल्या अवकळी पावस आणि गरपिटी मुळे झालेल्या नुकसानीपोटी १२२ कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. 
  2. जुलै २०२१ मधील साठी रुपये ३६५ कोटी ५७ लाख मदत  करण्यात आली आहे. 

संपूर्ण पंचनामे होण्यास वेळ लागणार असून अजूनही पाऊस सुरू आहे. अशा परिस्थितीतच अधिक वेळ न घालवत तूर्तास प्रचलित पद्धतीनुसार मदत द्यावी, अशी भूमिका काही मंत्र्यांनी मांडली. त्यावर सर्वांनी सहमती दर्शवली आणि तातडीने मदतीचा निर्णय घेण्यात आला.

2021 च्या खरीप ईपिक पाहणीस मुदतवाढ किती

या शेतकऱ्यांना १२२ कोती २६ लाख रुपयांची मदत मिळणार

गारपीट व अवकाळी पावसामुळे मार्च, एप्रिल व मे महिन्यात कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागांतील काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना १२२ कोटी २६ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून हा निधीही वितरित करण्यात आला आहे.

३३ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त झालेल्या नुकसान ग्रस्तांना मदत 

अतिवृष्टीमुळे जुलैपर्यंत ४ लाख २१ हजार हेक्टर शेतीवरील पिकांचे नुकसान झाले होते. आतापर्यंत १६ लाख हेक्टरचे पंचनामे पूर्ण झाले असून उर्वरित पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. पुढच्या १० दिवसात सर्व पंचनामे करून होतील. ज्या शेतीचे ३३ टक्के किंवा त्याहून अधिक नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत मिळणार असल्याचे सांगितले आहे.

राज्यात जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवली होती. यात शेतपिकांच्या नुकसानाकरिता बाधितांना आर्थिक मदत म्हणून एकूण 365 कोटी 67 लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या मदतीमुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

गाई गोठा, शेळीपालन योजना

अतिवृष्टीमुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता बाधितांना मदतीचे वाटप करण्यासाठी 

कोकण विभागासाठी ८ कोटी ५१ लाख रुपये, 

नाशिक विभागासाठी १ लाख रुपये, 

पुणे विभागासाठी १५० कोटी १२ लाख रुपये,  

अमरावती विभागासाठी ११८ कोटी ४१ लाख रुपये,  

औरंगाबाद विभागासाठी ७७ कोटी ९७ लाख, 

नागपूर विभागासाठी १० कोटी ६५ लाख रुपये 

याप्रमाणे एकूण ३६५ कोटी ६७ लाख रुपये इतका निधी मंजूर झाला आहे.

हे पण वाचा

पीक विमा तक्रार कुठे करायची

फळबाग पीक वीमा योजना अर्ज सुरू

Tags