Type Here to Get Search Results !

संजय गांधी निराधार योजना. Sanjay Gandhi baseless scheme

 Sanjay Gandhi Niradhar Yojana:

संजय गांधी निराधार योजना


 राज्य शासनाच्या वतीने अनेक योजना चालविण्यात येत आहेत त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना आहे.

महाराष्ट्र सरकार निराधार व्यक्ति, अंध, अपंग, अनाथ मुलांना, दिर्घ आजार, घटस्फोटीत स्त्रिया,   वेश्याव्यवसायातून मुक्त स्त्रिया इ साठी. विविध योजनांद्वारे आर्थिक मदत पुरवते.

या योजनांमध्ये काही योजना राज्य सरकार आणि काही केंद्र शासनाकडून कार्यान्वित केल्या आहेत आणि काही योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारद्वारे एकत्रित अंमलात आणली आहेत. संजय गांधी निराधार अनुदान योजना १९८० पासून राबविण्यात येत आहे.

सर्वसाधारणपणे समाजातील निराधार व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्ती स्वत:चा उदरनिर्वाह करु शकत नाहीत त्यासाठी ‘संजय गांधी निराधार योजना’ राबविण्यात आलेली आहे.

Sanjay Gandhi Niradhar Yojana अटी व शर्ती

 • किमान १५ वर्षांपासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
 • निराधार, वृद्ध व्यक्ती,  अंध, अपंग, शारीरिक, मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, विधवा, अत्याचारित महिला, घटस्फोटीत महिला, अनाथ मुले, तृतीयपंथी, परित्यक्त्या असणे गरजेचे आहे.
 • वय ६५ वर्षांपेक्षा कमी असायला हवे.
 • कुटुंबाचे उत्पन्न प्रतिवर्षी रुपये २१,०००/- पर्यंत असायला हवे.
 • जमीन मालक असू नये.

संजय गांधी निराधार योजना पात्रता

 1. अपंगातील अस्थिव्यंग, अंध, मुकबधीर, कर्णबधिर, मतिमंद इत्यादी प्रवर्गातील स्त्री व पुरुष.
 2. क्षयरोग, पक्षाघात, प्रमस्तीष्कघात, कर्करोग, एड्स (HIV+), कुष्ठरोग या सारख्या आजारामुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारे स्त्री व पुरुष.
 3. निराधार महिला, निराधार विधवा, घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोटी झालेल्या परंतु पोटगी न मिळणाऱ्या किंवा या योजनेखाली विहित केलेल्या उत्पन्न मर्यादा पेक्षा कमी पोटगी मिळणाऱ्या महिला व वेश्या व्यसायातून मुक्त केलेल्या महिला.
 4. शेतमजूर महिला.
 5. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न या योजने खालील विहित उत्पन्नापेक्षा कमी असल्यास ते कुटुंब.
 6. अनाथ मुले (18 वर्षांखालील)

संजय गांधी निराधार योजना उत्पन्न मर्यादा

 • कुटूंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न रु.21000 /- किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
 • या योजनेअंतर्गत लाभार्थ्याची मुले 25 वर्षाची होईपर्यत किंवा नोकरी मिळेपर्यत (शासकीय/निमशासकीय/खाजगी) यामध्ये जे अगोदर घडेल तोपर्यत लाभार्थ्याना लाभ देण्यात येतो.
 • लाभार्थ्याना फक्त मुलीच असतील तर अशा लाभार्थ्याच्या बाबतीत मुलीचे वय 25 वर्षे झाले अथवा त्यांना नोकरी लागली किंवा त्यांचे लग्न होऊन त्या नांदावयास गेल्या तरी सुध्दा लाभ चालु राहील                            

Sanjay Gandhi Niradhar Yojana Documents

 1. वयाचा दाखला
 2. रहिवासी दाखला
 3. उत्पन्नाचा दाखला/ दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीमध्ये समावेश असल्याबद्दलचा साक्षांकित उतारा.
 4. अपंगत्व/ रोगग्रस्त बाबत जिल्हा शल्यचिकित्सक (सिव्हील सर्जन)/ सरकारी हॉस्ल्च्य  रुग्णालयांच्या वैद्यकीय अधीक्षक यांचा दाखला
 5. किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी

लाभाचे स्वरूप व संपर्क कुठे साधावा

प्रत्येक लाभार्थीस दरमहा प्रत्येकी 1000 रुपये मिळतील.

लाभार्थींना त्याच्या / तिच्या अपत्याचे वय 25 वर्ष होईपर्यंत, किंवा तो / ती नोकरी करे पर्यंत , जे आधी होईल लाभ दिला जाईल. जर लाभार्थीला फक्त मुलीच असतील, तर जरी त्या 25 वर्षांच्या झाल्या किंवा विवाहित असल्य तरीही लाभ कायम राहील.

संपर्क कुठे साधावा- गावातील तलाठी तसेच तहसिल कार्यालय. अधिक माहीतीसाठी गावातील तलाठी तसेच तहसिल कार्यालयात सपंर्क साधावा. 

(sanjay gandhi niradhar yojana 2021 maharashtra) 

Tags