Type Here to Get Search Results !

कापूस उत्पादन वाढण्यासाठी उपाय, कापूस वाढीसाठी औषध.

कापूस उत्पादन वाढवा हे उपाय करून


शेतकर्‍यांसाठी कृषि विषयक सल्ला पीक कापूस

जूनी व जड पाने काढणे
कपाशीचे पीक साधारणतः ६० दिवसांचे झाल्यावर झाडांना ११ ते १३ फांद्या फुटलेल्या असतात.
अशावेळी शेंड्याकडील तीन फांद्या सोडून झाडांवरील खालील फांद्यांवरील जूने मोठे पान काढावे.
जास्तीत जास्त ७ ते १० पाने एका झाडाची निघतात. पाने शेतातच पडू द्यावीत.
असे केल्यामुळे पीक उत्पादनात निव्वळ २०% पर्यंत वाढ होते.
संपूर्ण झाड मोकळे होत असल्यामुळे जून्या पानांखाली लपलेल्या कीडींपासून व रोगांपासून संरक्षण तर होतेच त्याच बरोबर संपूर्ण खोड व फांद्या सूर्यप्रकाशात आल्यामुळे आणि मोकळी हवा भेटल्यामुळे बोंडे लागण्याचे प्रमाण वाढते.

कापशी वाढीसाठी औषध

संजीवकांचा वापर हा लागवड अंतराशी निगडीत आहे*.
लागवड अंतर ५ X १ फूट किंवा यापेक्षा जास्त असल्यास लिहोसीनची फवारणी लागवडीपासून ६० दिवसांनी १० लिटर पाण्यात २ मिली या प्रमाणात करावी.
यानंतर पीक ९० दिवसांचे असतांना जीए १० पीपीएम व १% युरीयाची फवारणी करावी.
लागवड अंतर कमी असल्यास व जोड ओळ पद्धतीमद्धे या फवारण्या १० दिवस अगोदर (म्हणजेच ५० दिवसांनी व ८० दिवसांनी) करणे गरजेचे आहे.
लागवडीपासून १०० दिवसांनी पोटॅशियम हायड्रोजन ऑर्थोफॉस्फेट ५० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे._

कपाशी मधे गुलाबी बोंड अळी नियंत्रण

गेल्यावर्षी बीटी कपाशीचे ७० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान गुलाबी बोंडअळीमुळे झाले होते
शेतकरी बांधवांनो यावर्षी या अळीचा प्रादुर्भाव हंगामी कपाशीमध्ये मोठ्या प्रमाणावर जुलै महिन्यात दिसू लागला आहे.
यापुढेही अळी मोठ्या प्रमाणावर कापूस पिकाचे नुकसान करू शकते. वेळीच या कीडींवर नियंत्रण न मिळवल्यास आलेले पीक हातेच जावू शकते.
-यासाठी दररोज दुपारी तीन नंतर कपाशी पिकांमध्ये निरिक्षणे घ्यावीत. निरिक्षण करतांना जर एखादे फुल पिवळे दिसले तर तात्काळ ते तोडावे. अशा फुलाचे तोंड एकदम घट्ट चिकटलेले दिसेल.
यालाच डोमकळी असेही म्हणतात. अशावेळी या फुलाच्या पाकळ्या वेगळ्या केल्यास अशा फुलांमध्ये एक ते दोन गुलाबी बोंडअळ्या आपणास पहावयास मिळतील._
-तोडलेली फुले तात्काळ नष्ट करावीत.
-फवारणी करतांना
5 % निंबोळी अर्काची प्रतिबंधातमक फवारणी करावी.
- जर 8 – 10 पतंग सलग तिन दिवस प्रति सापळा किंवा 10 % प्रादुर्भावग्रस्त हिरवी बोंडे किंवा एक जिवंत अळी प्रति 10 हिरवी बोंडे / पाते आढळल्यास आर्थिक नुकसान पातळी समजावी व खालिल कीटकनाशकांची फवारणी ताबडतोब करावी.

बोंड आळी कीटकनाशक फवारणी

1.प्रोफेनोफोस 50 ईसी
20 मिली.
(बाजारातील नाव क्वॅक्रोन)
2.प्रोफेनोफोस 40 % + सायपरमेथ्रीन 4 % ईसी
20 मिली.(पॉलीट्रिन syngeta)
2.थायोडीकार्ब 75 डब्लुयुपी
20 ग्राम (लार्विन बायर)
3फेनप्रोपॅथ्रीन 10 ईसी
10 मिली.(डेनिटॉल सुमितोमो)
4.डेल्टामेथ्रीन 1% व ट्रायझोफॉस 35% ईसी
16 मिली.(विराट upl)?
5.पॉयरीप्रॉक्झीफेन 9.3% व फेनप्रोपॅथ्रीन 15% EC
20 मिली.
6.क्लोरॅन्ट्रीनीलीप्रोल 9.3% व लॅमडा सायहॅलोथ्रीन 4.6% ZC
5 मिली (एम्पलिगो )
7.इंडाक्झाकार्ब 14.5% व असीटामाप्रिड 7.7%SC
10 मिली.
  • वरील कीटकनाशकाचे प्रमाण साध्या पंपासाठी आहे
  • पेट्रोल पंपासाठी हे प्रमाण तीन ( 3 ) पट वापरावे
  • शक्यतो कीटकनाशकाची फवारणी सकाळी 9 चा आधी किंवा संध्याकाळी 4.00 चा नंतर करावी*
  • एकरी तीन ते पाच डेल्टास्टिकी ट्रॅप लावावेत.
  • हे सापळे कृषी विक्रेते यांचेकडे उपलब्ध असतात.
  • या कामगंध सापळ्यांमध्ये येणा-या कीडींवर सतत निरिक्षण ठेवावे....

ट्रॅक्टर लाभार्थी लॉटरी 👉महा डीबीटी लाभार्थी यादी 
पीएम किसान योजना 👉लाभार्थी पात्र यादी
महा डीबीटी लॉटरी 2022 👉लॉटरी येथे क्लिक करा
प्रधानमंत्री आवास योजना 👉घरकुल मंजूर यादी येथे पहा