Type Here to Get Search Results !

अहमदनगर जिल्ह्यात होणार उसदराची स्पर्धा...

साखर कारखान्यांना करावी लागणार ऊस दराची स्पर्धा

This year the sugar mills company will have to rise the price of sugarcane | यंदा साखर कारखान्यांना करावी लागणार ऊस दराची स्पर्धा

sugarcane-price-2023

येणारा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वीच ऊस तोडणी व वाहतूक दरात वाढ करण्याची मागणी ऊस तोडणी कामगार व वाहतूक संघटनेतून होत आहे. रसायनिक खतांची वाढती महागाई कमी भाव यामुळ उस लागवड क्षेत्र घटले आहे. उसाला 4000 रुपये प्रतिटन दर देण्याची मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.

नगर जिल्ह्यात उस लागवड कमी

उसाचे आगार असलेल्या नगर जिल्ह्यात यंदा ऊस टंचाई निर्माण होणार आहे. सतत बदलते हवामान, सातत्याने मिळणारा कमी भाव, तोडणीसाठी मारावे लागणारे हेलपाटे यामुळे मोठ्या प्रमाणावर ऊस उत्पादक शेतकरी इतर नगदी पिकांकडे वळला आहे. त्यामुळे यंदा साखर कारखान्यांना जास्तीत जास्त ऊस भाव देण्यासाठी स्पर्धा करावी लागणार आहे.

अहमदनगर जिल्ह्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला. यामुळे उसाची वाढ खुंटली, हुमणी अळीचा प्रादुर्भाव ऊस पिकावर झाला. ऊस उत्पादन खर्चात झालेली वाढ, विस्कळीत वीजपुरवठा, बिबट्या व रानडुकरांचा त्रास,  या सर्व कारणांमुळे उसाचे उत्पादन ३० टक्के घटणार आहे.

नेवासा तालुक्यात तोडणी हंगाम तीनच महीने

नेवासा सारख्या तालुक्यात  साखर कारखान्यांचा गळीत हंगाम फक्त तीन महिनेच चालेल. हा हंगाम चालविण्यासाठी साखर कारखान्यांना ऊस मिळविण्यासाठी कसरत करावी लागेल. उसाची कमतरता आहे. त्यामुळे उसाची पळवापळवी होईल. यामुळे साखर कारखान्यांना ऊस भावाची स्पर्धा करावी लागणार आहे.

नेवासा तालुक्यात २० हजार हेक्टर क्षेत्रावर उसाचे पीक असते. कमी पावसामुळे फक्त ५ हजार हेक्टर क्षेत्रावर आडसाली उसाची लागवड झाली. हुमणी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मे महिन्यात उपाययोजना करण्यात आली होती. - धनंजय हिरवे, नेवासा तालुका कृषी अधिकारी

हे पण वाचा-