पंजाब डख पाऊस अंदाज
Monsoon Update 2023 : पंजाबराव डख हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. त्यांनी वर्तवलेला हवामान अंदाज तंतोतंत खरा ठरत असल्याचा दावा शेतकरी करतात. डख यांचा हवामान अंदाज शेती करताना त्यांना उपयोगीचा ठरतो असं मत शेतकरी कायमच मांडतात.
येत्या 14, 15 आणि 16 मार्च ला अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज डाख यांनी सांगितला असून शेतकर्यांनी पिकाची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केलेआहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 13 ते 16 मार्चदरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे. तर विदर्भात 14 ते 16 मार्च दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे. उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी पुन्हा गारपिटीसह पावसाचा अंदाज असून यामुळे कापणीला आलेल्या पिकांचा फटका बसण्याची शक्यता आहे.
याआधीही मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे शतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. अशातच पुन्हा एकदा राज्यात अनेक भागात अवकाळी पावसाचा फटका बसणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. 16 मार्चपर्यंत राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊस पडू शकतो. यातच प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा मोठ्या प्रमाणात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. rain alert maharashtra next three days
मान्सून 2023 बाबत वर्तवला हा आहे अंदाज 👇👇
पंजाबरावांनी मान्सून 2023 बाबत देखील माहिती दिली आहे. पंजाबरांच्या मते यंदा एल निनो चा धोका भारतात राहणार नाही. मान्सून हा त्याच्या ठरलेल्या वेळेतच यावर्षीही दाखल होणार आहे. साधारणपणे सात जूनच्या आसपास महाराष्ट्रात पावसाची हजेरी राहणार आहे. गेल्या हंगामासारखाच याही हंगामात चांगला पाऊस राहणार असल्याची माहिती पंजाब रावांनी दिली आहे.