राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाने (Maharashtra Rain) हजेरी लावलीय. त्याआधी ढगांचा जोरदार गडगडाट नोंदवला गेला. रायगड, नवी मुंबईत मुसळधार पावसाने अचानक लावलेल्या हजेरीने अनेकांची तारांबळ उडवली. ढगांच्या गडगटासह झालेल्या मुसळधार पावसाने गणेशभक्तही सुखावले आहेत. गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi 2022) मुहूर्तावर राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाने कमबॅक केलंय.
नगर, पुणे जिल्ह्यात पावसाने लावली हजेरी
हवामान विभागाने (weather Alert) वर्तवलेल्या अंदाजानुसार पावसाने हजेरी लावली असून पुढील तीन दिवस पावसाचा मुक्काम असाच कायम राहणार आहे. दरम्यान, जोरदार पावसामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडीत झाला आहे. त्यामुळे अनेक गणेशभक्तांचा हिरमोडही झाला. उत्तर पुणे आणि अहमदनगरमध्ये जोरदार वादळी पाऊस झालाय. हा वादळी पाऊस वेगाने नवी मुंबई, रायगडच्या दिशेने सरकत असून येत्या काही तासांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.
कोणत्या जिल्ह्यांत येलो अलर्ट?
- पुणे
- अहमदनगर
- सोलापूर
- बीड
- लातूर
- सांगली
- कोल्हापूर
- सिंधुदुर्ग
- रत्नागिरी
- रायगड
- सातारा
- उस्मानाबाद
- नांदेड
हवामानाच्या अंदाजाप्रमाणे गडगडाटासह महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावलीय. पुणे, अहमदनगरमध्ये जोरदार पाऊस झाला. वादळी पावसाचे हेच ढग वेगाने रायगड, मुंबईच्या दिशेने सरकत असल्याचं पाहायला मिळालंय.