Type Here to Get Search Results !

घरकुल योजनेपासून वंचित लोकांची शासनाने मागवली माहिती,

 


संगणकपरिचालक संघटनेने घरकुल योजने संदर्भात केलेल्या मागणीची राज्यशासनाकडून दखल ! प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेत वंचित राहिलेल्या लाखो कुटुंबांची शासनाने नव्याने माहिती मागवली ! सिस्टिमच्या चुकीमुळे घरकुल योजनेत नाव न आल्याने संगणकपरिचालकांना दोषी धरता येणार नाही !



घरकुल ड यादी सर्वे 2022 

 2018 - 2019 मध्ये राज्यात केंद्र शासन व राज्य शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत लाखो कुटुंबाचा ऑनलाईन सर्व्हे आवास प्लस एप्प द्वारे करण्यात आला होता. हा सर्व्हे पर्यवेक्षकाच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतच्या संगणकपरिचालकानी केला होता,त्यात राज्यातील ५७ लाख ६० हजार कुटुंबांची नोंदणी करण्यात आली होती.  त्यातील सुमारे १० लाख ८४ हजार कुटुंबे ऑनलाईन सिस्टीममुळे थेट अपात्र ठरवण्यात आली, परंतु यात संगणकपरिचालकांचा कोणताही दोष नसताना दोषी ठरवून अनेक संगणकपरिचालकावर कारवाई होत असल्याचे राज्य संघटनेच्या लक्षात आल्यानंतर तत्कालीन ग्रामविकासमंत्री ना.हसनजी मुश्रीफ साहेबांना ०५ एप्रिल २०२२ रोजी निवेदन दिले होते. 

तांत्रिक कारणामुळे लोक अपात्र 

त्यात घरकुल योजनेत सिस्टीममुळे अपात्र झालेल्या कुटुंबासाठी संगणकपरिचालकांना दोषी न धरणे व जे कुटुंब सिस्टीममुळे अपात्र झाले आहेत, त्यांचा सर्व्हे नव्याने करण्याची मागणी केली त्याची दखल घेत ग्रामविकास विभाग व राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण विभागाने सर्व्हे पासून वंचित राहिलेल्या कुटुंबांची माहिती तात्काळ मागवली असल्याचे महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी दिली आहे.

हे ही वाचा - घरकुल मंजूर ड यादी

       याबाबत सविस्तर वृत्त की,राज्याच्या ग्रामीण भागातील प्रत्येक बेघर कुटुंबाला स्वतःच्या  हक्काचे घर देण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना(घरकुल) चा ऑनलाईन सर्व्हे(प्रपत्र ड ) आवास प्लस एप्प द्वारे पंचायत समितीने दिलेले पर्यवेक्षक/प्रगणक यांच्या मार्गदर्शनाखाली संगणकपरिचालकानी केला,त्यात सर्व्हे साठी संबंधित ग्रामपंचायतीनी ग्रामसभे द्वारे जी यादी दिली होती त्या सर्व कुटुंबांचा सर्व्हे संगणकपरिचालकानी केला त्यानुसार राज्यातील सुमारे ५७ लाख ६० हजार ५६ कुटुंबांचा प्रामाणिकपणे सर्व्हे केला होता.

 त्यापैकी ४४ लाख ११ हजार ६७७ कुटुंबे पात्र ठरली व ऑनलाईन सिस्टीममुळे त्यांच्या चुकीमुळे सुमारे १० लाख ८४ हजार ५७५ कुटुंबे थेट अपात्र करण्यात आली. इकडे प्रपत्र ड च्या याद्या प्रत्येक गावात प्रसिद्ध झाल्या त्यात काही कुटुंबांची नावे आली तर काही कुटुंबे अपात्र असल्याने त्यांची नावे आली नव्हती  ऑनलाईन सिस्टीममुळे तुमचे नाव कमी झाले आहे. 

हे ही वाचा - घरकुल मंजूर यादी 2022

 ०५ एप्रिल २०२२ तत्कालीन ग्रामविकासमंत्री ना.मुश्रीफ साहेबांना संघटनेच्या वतीने निवेदन देऊन प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या घरकुल योजनेत अनेक कुटुंबे ऑनलाईन सिस्टीममुळे अपात्र ठरवण्यात आले असून त्यात संगणकपरिचालकांना दोषी धरू नये तसेच राज्यातील अनेक कुटुंबे हे या तांत्रिक चुकीमुळे पात्र असताना सुद्धा वंचित राहिले असून त्यांची नव्याने नोंदणी करण्यासाठी राज्य शासनाने परत मोहिम आखावी अशी मागणी केली होती.

घरकुल योजनेपासून वंचित लोकांना मिळणार लाभ

 त्यानुसार तत्कालीन ग्रामविकासमंत्री ना.हसनजी मुश्रीफ यांनी उपसचिव यांना विनंती प्रमाणे चौकशी अहवाल सादर करण्याची सूचना केली होती,त्यानुसार मा.कक्ष अधिकारी स्नेहल अडसूळ मॅडम यांनी २० जून २०२२ रोजी संचालक,राज्य व्यवस्थापन कक्ष –ग्रामीण गृहनिर्माण,बेलापुर,नवीमुंबई यांना पत्र देऊन या दोन्ही मागण्या संदर्भात कळवले होते,

त्या नुसार ०३ ऑगस्ट २०२२ रोजी मा.उपसंचालक राज्य व्यवस्थापन कक्ष –ग्रामीण गृहनिर्माण,महाराष्ट्र यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मा.मुख्यकार्यकारी अधिकारी यांना पत्र देऊन सर्व्हे केलेली पण सिस्टीममुळे अपात्र झालेली व सध्या पात्र असलेली  तसेच आवास प्लस अंतर्गत प्रपत्र ड अंतर्गत सर्व्हे न झालेली परंतु सध्या पात्र असलेल्या सर्व कुटुंबांची माहिती मागवली असून त्यामुळे राज्यातील लाखो पात्र  कुटुंबे त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे.

Tags