Type Here to Get Search Results !

कांदा उत्पादक शेतकरी हतबल, कांदा दरात घसरण...

 Onion Rate : कांद्याने केला वांदा..! कांदा दरातील घसरणीमुळे शेतकरी हतबलमहाराष्ट्रातील लाखो कांदा उत्पादक शेतकर्‍यांवर केवळ 6 ते 14 रुपये किलो दराने कांदा विकण्याची वेळ आली आहे. मध्यंतरी नाफेडने नाफेडने अडीच लाख टन कांद्याची खरेदी केली. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला होता. मात्र आता हाच कांदा पु्न्हा बाजारात दाखल होत असल्याने दर घसरण्याचा धोका वाढला आहे.

लासलगाव : सध्याच्या महागाईत केवळ कांदा हा सर्वसामान्यांना दिलासा देत आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाण्यात आणत आहे. गेल्या चार महिन्यांपासून (Onion Rate) दरात सुरु असलेली घसरण आजही कायम आहे. त्यामुळे यंदा सर्वात मोठ्या (Cash Crop) नगदी पिकाचा लाभ शेतकऱ्यांना मिळालेलाच नाही. 

बाजारपेठेतील घटती मागणी आणि वाढते उत्पादन यामुळे गेल्या 5 महिन्यांपासून कांद्याला 15 रुपये किलोपेक्षा अधिकचा दर हा मिळालेलाच नाही.  (Lasalgaon Market) लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला 6 रुपये किलो पासून ते 14 रुपये किलो पर्यंत दर मिळत आहे कांद्याचा भाव एवढा कमी झालाय की उत्पादन खर्चही निघणं मुश्किल झाले आहे. असे असतानाही सध्या राज्यभर कांदा लागवड आणि पेरणीही होत आहे.

नाफेडमुळे आधार अन् नुकसानही

महाराष्ट्रातील लाखो कांदा उत्पादक शेतकर्‍यांवर केवळ 6 ते 14 रुपये किलो दराने कांदा विकण्याची वेळ आली आहे. मध्यंतरी नाफेडने नाफेडने अडीच लाख टन कांद्याची खरेदी केली. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला होता.

मात्र, आता हाच कांदा पु्न्हा बाजारात दाखल होत असल्याने दर घसरण्याचा धोका वाढला आहे. नाफेडने अडीच लाख टन कांद्याची खरेदी केली आहे पुढील महिन्यापासून देशातील मोठ्या मोठ्या शहरांमध्ये नाफेडणे खरेदी केलेला कांद्याचा निकस सुरू होणार आहे त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात कांद्याचा आणखी वांदा होईल असेच चित्र आहे.

शेतकऱ्यांना अपेक्षा अनुदानाची

सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीस येणारा उन्हाळा कांदा हा मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये चाळीत साठवून ठेवला होता. चांगला दर मिळेल यापेक्षाने अनेक शेतकरी अजूनही कांदा चाळीत साठवून ठेवलेला आहे. मात्र, सततच्या पावसामुळे या कांदा पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. इतके दिवस कांदा साठवूनही अपेक्षित दर मिळत नसल्याने केंद्र व राज्य सरकारने कांद्याला अनुदान तसेच निर्यातील प्रोत्साहन देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Tags