Type Here to Get Search Results !

मुसळधार पाऊस पुन्हा सुरू होणार...

उद्यापासून राज्यात 4 दिवस मुसळधार पाऊस


Maharashtra Rain update

राज्यात यंदा पावसाचे आगमन उशिरा झाले असले तरी जुलैच्या 1 तारखेपासून सलग 18 दिवस पावसामध्ये सातत्य राहिले होते. त्यामुळे जून महिना कोरडा गेला असतानाही आता सरासरीपेक्षा अधिकच्या पावसाची नोंद प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालेली आहे. त्यानंतर 5 दिवस पावसाने उघडीप दिलेली होती. शेती मशगातीच्या कामांना वेग येत असतानाच पुन्हा 23 जुलैपासून पावसाचा इशारा देण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

गेल्या पाच दिवसांपासून राज्यात (Rain) पावसाचा जोर कमी झाला आहे तर काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी रिमझिम पाऊस हा सुरुच आहे. असे असले तरी आगामी 4 ते 5 दिवस राज्यात (Heavy Rain) मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज (IMD) हवामान विभागाने वर्तवलेला आहे. 1 जुलैपासून राज्यात सुरु झालेला पाऊस हा 18 जुलैपर्यंत कायम होता. गेल्या 5 दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता तर दुसरीकडे शेती मशागतीच्या कामांनाही वेग आला होता. आता 23 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागात वरुणराजाची हजेरी राहणार आहे. त्यामुळे पावसाचा धोका कायम असून नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे अवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो?

राज्यात गेल्या पाच दिवसांमध्ये तुरळक ठिकाणीच पावसाने हजेरी लावली असली तरी 23 जुलैपासून पुन्हा पाऊस सक्रिय होणार आहे. मध्यम ते जोरदार असे या पावसाचे स्वरुप राहणार आहे. रविवारी अधिकचा तर सोमवारपासून मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. सर्वाधिक पाऊस हा कोकणात बरसणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

राज्यात यंदा पावसाचे आगमन उशिरा झाले असले तरी जुलैच्या 1 तारखेपासून सलग 18 दिवस पावसामध्ये सातत्य राहिले होते. त्यामुळे जून महिना कोरडा गेला असतानाही आता सरासरीपेक्षा अधिकच्या पावसाची नोंद प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालेली आहे. त्यानंतर 5 दिवस पावसाने उघडीप दिलेली होती. शेती मशगातीच्या कामांना वेग येत असतानाच पुन्हा 23 जुलैपासून पावसाचा इशारा देण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शिवाय जिल्हा प्रशासनादेखील सतर्क रहावे लागणार आहे. आगोदरच धरणे ओव्हरफ्लो झालेली आहेत. यातच आता मुसळधार पाऊस झाला तर धोका निर्माण होणार आहे.

आणखी किती दिवस पाऊस?

राज्यात बहुतांश जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झाली आहे. त्यामुळं शेती  पिकांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, गेल्या दोन ते तीन दिवसापासून पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळं पूरस्थिती निर्माण झालेल्या ठिकाणच्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. अशातच, आजपासून चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना खरबदारी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, मुंबईसह परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. 

राज्यात झालेल्या पावसामुळं शेतकरी आनंदी आहेत. तर काही ठिकाणी पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसानही झालं आहे. तर काही ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, मागील दोन दिवसापासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळं ज्या ठिकाणी पूरस्थिती होती, त्या ठिकाणच्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दरम्यान, पावासाचा जोर कमी झाल्यामुळं शेतीच्या कामांना वेग आला आहे.


दरम्यान, आजपासून चार दिवस मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात मुंबईसह कोकण, नाशिक आणि मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.  मराठवाड्यातील जालना, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत रविवार आणि सोमवारी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. धुवाधार पावसानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसानं काहीशी विश्रांती घेतली आहे. मोजक्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. तर उर्वरित ठिकाणी पावसानं उघडीप घेतली होती. मात्र, अशातच आता हवामान विभागानं आजपासून मुसळदार पावासाचा इशारा दिला आहे. त्यामुळं राज्यात उघडीप दिलेला पाऊस पुन्हा एकदा हजेरी लावणार आहे.