कांदा दर राहणार नियंत्रणात...
देशातील महागाई खूप वाढली आहे. कांद्याचे दर वाढून आणखी त्यात भर पडू नये त्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. महागाईमुळे अनेकवेळा कांद्याचे भाव वाढून लोकांना त्रास दिला आहे. आज कांद्याचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असले तरी सरकार काद्यांच्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस पावले उचलणार आहे. अशी एबीपी न्यूज वाहिनीने याबाबत माहिती दिली आहे.
पुढच्या महिन्यापासून केंद्र सरकार आपल्या बफर स्टॉकमधून देशातील मंडईंमध्ये कांद्याचा पुरवठा करणार आहे. केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार राज्यमंत्री अश्वनी कुमार चौबे यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात माहिती दिली आहे की मंडईतील बफर स्टॉकमधून पुरवठा ऑगस्ट महिन्यापासून सुरू होईल आणि या वर्षाच्या अखेरीपर्यंत सुरू राहील.
2.50 लाख टन कांदा बफर साठा
केंद्र सरकारने कांद्याच्या दरावर लगाम घालण्यासाठी विक्रमी बफर स्टॉक तयार केला आहे. सरकारने 2.50 लाख टन कांद्याचा बफर स्टॉक तयार केला आहे, जो आतापर्यंतचा सर्वाधिक आहे. यावेळी सरकारी कांद्याची खरेदीही विक्रमी पातळीवर झाल्याने देशात कांद्याचे बंपर उत्पादन झाले आहे.
देशात टोमॅटोचे भाव एका महिन्यात सुमारे एक तृतीयांश कमी झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत कांद्याचे दर नऊ टक्क्यांनी स्वस्त आहेत. देशभरात कांद्याची सरासरी किंमत 25.78 रुपये प्रतिकिलोवर आली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 9 टक्क्यांनी कमी आहे.