Type Here to Get Search Results !

महाराष्ट्रात बीड पॅटर्न पीक विमा योजना लागू.आता मिळणार 110 टक्के नुकसान भरपाई मिळणार...

महाराष्ट्र बीड पॅटर्न पीक विमा योजना 2022 


शेतकरी बंधुनो आपल्या महाराष्ट्र राज्यात शेतकरी बांधवांच्या पीक विमा योजना राबविण्याकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात पीक विमा बीड पॅटर्न लागू केला आहे. त्यामुळे हे PM Pik Vima Beed Pattern काय आहे. आधीच्या पीक विमा पद्धतीत आणि बीड पॅटर्न मध्ये काय बदल आहे. तसेच PM Pik Vima Beed Pattern 2022 विषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या या पोस्ट मध्ये जाणून घेणार आहोत.

बीड पॅटर्न नेमका काय? PM Pik Vima Beed Pattern 2022

शेतकरी बांधवांनी पीक विमा काढल्यानंतर, कंपनी कडे गोळा झालेल्या पैसे पैकी 50 टक्के रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात. तर 50 टक्के पैकी 20 टक्के कंपनीला राहतील. उर्वरित 30 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या विकासासाठी वापरण्यासाठी कंपनीनं राज्य सरकारला द्यावेत. या उलट ज्यावेळी नैसर्गिक आपत्ती येईल त्यावेळी    110 टक्के रक्कम  द्यावेत राज्य सरकार वरचे 40 टक्के रुपये कंपन्यांना देईल. हा पॅटर्न बीड जिल्ह्यात राबवण्यात येत आहे, 

 नवीन पद्धती फक्त बीड जिल्ह्यात राबविली होती. Pik Vima Beed Pattern हा सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आला होता.  आणि आता हा बीड पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राबविण्यात कृषी विभागाने मंजुरी दिलेली आहे. Pik Vima Beed Pattern 2022 च्या माध्यमातून कृषी विभाग निविदा काढून त्या माध्यमातून पीक विमा कंपनीची नियुक्ती करणार आहे. या बीड पॅटर्न मुळे शेतकरी बांधवांना काय फायदा होणार, हे महत्वाचे ठरणार आहे. बीड पॅटर्न मध्ये 80-110 टक्के या प्रकारामध्ये निविदा ह्या Peek vima beed Pattern च्या माध्यमातून प्रसिद्ध केल्या आहेत. 

बीड पॅटर्न पीक विमा भरपाई किती मिळणार?

Pik Vima Yojana Beed Pattern 2022 अंतर्गत अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरुन राबविण्यात येणार आहे. यामुळे आता आपल्या महाराष्ट्रातील शेतक-यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पीक विमा योजनेच्या बीड पॅटर्न मध्ये 80-110 सुत्रानुसार ही योजना आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत आहेत. या बीड पॅटर्न नुसार जर शेतकऱ्याचे नुकसान जास्त झाले तर अश्या वेळेस शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई ही 110% मिळणार आहे. त्याची अतिरिक्त रक्कम ही राज्य शासन उचलणार आहे.

जर शेतकरी बांधवांच्या शेत मालाचे नुकसान कमी झाल्यास पीक विमा कंपनीला 80% पेक्षा कमी रक्कम द्यावी लागल्यास कंपनीने शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई म्हणून दिलेली रक्कम तसेच 20 % नफा कंपनीकडे ठेऊन उर्वरित सर्व रक्कम ही राज्य सरकारला परत द्यावी लागणार आहे. त्यामुळे ही रक्कम सरकार विकास कामाकरीता वापरू शकणार आहेत. ही रक्कम जिल्ह्याच्या विकासाकरिता वापरण्यात येणार आहे. तसेच शेतकरी बांधवाचे नुकसान जास्त झाल्यास अधिकची रक्कम ही शासन देणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना सुद्धा या pik vima beed Pattern yojna अंतर्गत फायदा होणार आहे.

बीड पॅटर्न पीक विमा फायदा काय?

या पीक विमा योजना बीड पॅटर्न मध्ये शेतकरी बांधवांना पीक विमा नोंदणी करताना रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के तर खरीप हंगामासाठी 2 टक्के इतकी रक्कम ही शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांच्या हिष्याची प्रीमियम रक्कम असणार आहे. कापूस व कांदा इत्यादी पिकांकरिता ही रक्कम 5 टक्के असणार आहे. शेतकरी बांधवांनी भरलेल्या पीक विमा प्रीमियम व्यतिरिक्त प्रीमियम हा राज्य तसेच केंद्र शासन भरणार आहे.pik vima beed Pattern information in marathi 

पीक विमा भरण्यासाठी अंतिम दिनांक हा 31 जुलै असून त्यापूर्वी शेतकर्‍यांनी पीक विमा भरावा असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.


योजना पीक विमा योजना 2022
विभागकृषि विभाग
लाभार्थीशेतकरी
वेबसाइटpm pik vima
Tags