मोफत शिलाई मशीन योजना 2022
फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र
राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब व बेरोजगार महिलांसाठी विविध योजना सरकार राबवित असतात त्या योजनांपैकीच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री फ्री सिलाई मशीन योजना.
या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या गरीब महिलांसाठी मोफत शिलाई मशीन चे वाटप करण्यात येते जेणेकरून महिला घरी बसुन लोकांचे कपडे शिवून रोजगार प्राप्त करतील आणि त्यांच्या आर्थिक उत्पन्नात थोडीफार वाढ होईल.
या योजनेचा लाभ देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब महिलांना देण्यात येईल.
Lockdown मुळे देशातील बहुतांश उद्योगधंदे बंद झाले त्यामुळे पुष्कळ लोकांच्या नोकऱ्या गेल्या व ते बेरोजगार झाले त्यामुळे देशात बेरोजगारीची समस्या निर्माण झाली.या सर्वांचा विचार करून सरकारने free silai machine yojana सुरुवात केली.
फ्री सिलाई मशीन योजना उद्देश
आर्थिक दृष्ट्या गरीब महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप करून त्यांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे आहे.
या योजनेच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर बनविणे आहे जेणेकरून महिला स्वतःच्या पायावर उभे राहतील.
सर्वात शेवटी अर्जाची लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून अर्ज डाउनलोड करा
फ्री सिलाई मशीन योजनेच्या अटी
फ्री शिलाई मशीन योजनेचा लाभ ४० वर्षे वयावरील महिलांना घेता येणार नाही
१.२ लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही
अपंग किंवा विधवा महिलांना पारधन्य राहील.
आवश्यक कागदपत्रे काय आहेत ?
अर्जदाराचे आधार कार्ड
लाभार्थ्यांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न १.२ लाखांपर्यंत असणे आवश्यक)
जन्माचा दाखला (जन्म नोंदणी प्रमाणपत्र किंवा शाळेचा दाखला)
अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
अर्जदार महिला अपंग असल्यास अपंग असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक.
अर्जदार महिला विधवा असल्यास पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र असणे आवश्यक
अर्जदाराकडे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक.
रेशन कार्ड
फ्री सिलाई मशीन योजना करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरुण अर्ज डाउनलोड करा
अर्ज कुठे आणि कसा करावा
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून योग्य त्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडून अर्जदाराने सदर अर्ज आपल्या जवळच्या नगरपालिका / महिला व बालकल्याण विकास विभागात जमा करावा.