Type Here to Get Search Results !

आधार कार्डला कोणते बँक खाते लिंक आहे ते मोबाईल वर चेक करा ऑनलाइन.

Status Check Aadhaar Bank Linking Status


आधार कार्ड- बँक खाते लिंक चेक ऑनलाइन

नमस्कार बंधुनो आज तुमच्या साठी खूप महत्वाची माहिती घेऊन आलो आहे. आजकाल कोणतीही सरकारी सबसिडी असो किंवा सरकारी योजनेचे अनुदान हे थेट तुमच्या आधार कार्ड वर सोडले जाते आणि तुमच्या आधार कार्डला जे बँक खाते लिंक आहे त्या खात्यात ते अनुदान जमा होते.

बँक खाते - आधार लिंक आहे का हे चेक कसे करावे ?👇👇

मित्रांनो आपण बँक मध्ये ज्यावेळेस आपले खाते चालू करतो, त्यावेळेस बँक आपल्या खात्याला आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करते. परंतु तुमचे जर एकापेक्षा जास्त बँक मध्ये खाते असेल तर तुमच्या आधार कार्डला कोणते बँक खाते लिंक आहे हे पहाण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स पहा.

आता तुमच्या आधार कार्डला कोणते बँक खाते लिंक आहे हे आपण ऑनलाइन मोबाइल वर घरबसल्या चेक करू शकतो, तर पाहूया काय प्रोसेस आहे. 👇👇


  •  सर्वप्रथम खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • त्यानंतर UIDAI ची वेबसाइट ओपन होईल.
  • आता तुमचा 12 अंकी आधार नंबर टाका.
  • त्यानंतर समोर दिसत असलेला सेक्युरिटी कोड म्हणजे कॅपच्या कोड टाका.
  • सेंड otp वर क्लिक करा तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल वर otp येईल.

  • otp सबमीट केल्यावर लगेच तुमच्या समोर तुमचं आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेचे नाव दिसेल.

अशाप्रकारे तुम्ही मोबाईल पाहू शकता की तुमच्या बँक खात्याला तुमचे आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही. लिंक नसेल तर लगेच बँक शाखेत जाऊन आधार कार्ड लिंक करून घ्या. कारण सरकारी योजनेचे अनुदान किंवा शिष्यवृत्ती साठी ते अनिवार्य आहे.