Type Here to Get Search Results !

आता या ठिकाणी सातबारा उतारा होणार बंद.

 7/12 उतारा बंद होणार


सातबारा उतारा बंद होणार 

शहरातील शेतजमीन शिल्लक राहिली नाही. सर्वच जमिनीचे प्लॉट आणि बांधकाम झालेले आहे. तरीही काही लोक सातबारा मिळत असल्याने त्याचा गैरवापर करून खरेदी विक्रीचे प्रकार करतात. सातबाऱ्याचे रूपांतर प्रॉपर्टी कार्डमध्ये झाल्यानंतरही कर आणि ज्या काही लाभांसाठी सातबारा कायम ठेवल्याने याचा लोक गैरवापर करतात, फसवणुकीचे प्रमाण घडते. 

या कारणाने भूमी अभिलेख विभागाने सर्व शहरातील सातबारा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.याची सुरुवात पुण्यातील हवेली तालुक्यासोबत सांगली, नाशिकपासून, मिरज पासून याची सुरुवात करण्यात येणार आहे. तर नंतर संपूर्ण राज्यात हा प्रयोग राबवला जाणार आहे.

या ठिकाणी 7/12 उतारा बंद होणार 👇👇

सिटी सर्व्हे झाला असला तरी अनेक जमिनीचे सातबारा उतारा नाहीत यामुळे अनेक जमिनीचे घोटाळे समोर येत असतात. अशा घटनांना रोखण्यासाठी तसेच ज्या शेत जमिनींना सातबारा गरजेचा नाही अशा वेळी सातबारा बंद करणे योग्य ठरेल. सातबारा बंद करण्याची प्रक्रिया भूमी अभिलेख विभागाने सुरू केली आहे.

राज्यातील ज्या शहरांमध्ये सिटी सर्व्हेचे काम झाले आहे, अशा शहरात मिळकतींचे सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड अशी दोन्ही सुरू आहेत. अथवा, सिटी सर्व्हे झाले असून देखील सातबारा उतारा सुरू आहे, अशा शहरांमध्ये सातबारा बंद करून त्याठिकाणी फक्त प्रॉपर्टी कार्ड सुरू ठेवण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे. त्यासाठी भूमी अभिलेख विभागाने एनआयसीच्या मदतीने संगणक प्रणाली विकसित केली आहे. 

 या ठिकाणी 7/12 उतारा बंद होणार 👇👇

त्यामुळे शहरासह राज्यातील अनेक शहरात जमिनींच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात होणारी फसवणूक टळणार आहे. या प्रकल्पाच्या यशस्वीतेनंतर राज्यभरात हा उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती राज्याचे जमावबंदी आयुक्त निरंजन सुधांशू यांनी दिली. महापालिकेच्या हद्दीत यापूर्वी भूमी अभिलेख विभागाकडून सर्व मिळकतीचे प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यात आले आहे, मात्र त्या जागेचे सातबारा उतारे बंद करण्यात आलेले नाही.

त्यामुळे अनेक ठिकाणी जागांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहाराच्या वेळी सोईनुसार सातबारा उतार्‍यांचा वापर केला जातो. त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. फसवणुकीचे प्रकार देखील वाढत आहेत. त्यामुळे भूमी अभिलेख विभागाने सिटी सर्व्हे झालेल्या भागातील सातबारा उतारे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

या ठिकाणी 7/12 उतारा बंद होणार 👇👇

.