Type Here to Get Search Results !

पीएमकिसान ई केवायसी मोबाइल वर कशी करावी ?

Pmkisan Kyc on Mobile by otp


पीएम किसान ए केवायसी 2022

 शेतकरी बंधुनो  (Pm kisan Yojna) पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी e-KYC हे अनिवार्य केले आहे. 12 व्या हप्त्यासाठी e-KYC हे बंधनकारक आहे. अन्यथा पुढील 2000 रुपये हप्ता शेतकऱ्यांना मिळणार नाही.

याच कारणामुळे सरकारने 2 वेळा अंतिम तारीख वाढवली आहे. 31 जुलै 2022 पर्यन्त सर्व लाभार्थी शेतकर्‍यांनी पीएमकिसान केवायसी करून घ्यावी. आता शेतकऱ्यांना घरबसल्या मोबाइलवरून हे काम आधार ओटीपीच्या माध्यमातून पूर्ण करता येणार आहे. अगोदरच्या काळात शेतकऱ्यांना जवळच्या सीएससी सेंटरमध्ये जाऊन बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनद्वारे ईकेवायसी करून घ्यावे लागत होते.

आता फक्त दोन दिवस बाकी आहेत तर आपण केवायसी लगेच करून घ्यावी.  केवायसी करण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या मोबाईल फक्त otp द्वारे केवायसी करू शकता. त्यासाठी फक्त आधार कार्ड नंबर आणि आधारला लिंक असलेला मोबाईल आवश्यक आहे. केवायसी ची प्रोसेस खाली दिलेली आहे. 

 मोबाईलवरुन पीएमकिसान ‘ई-केवायसी’ अशी करा 👇👇

 • मोबाईलच्या माध्यमातून ई-केवायसी करण्यासाठी 
 • सर्व प्रथम  Google वरुन https://pmkisan.gov.in/ या वेबसाईटवर जावे .
 •  होम पेज व आल्यावर Farmer Corner  ऑप्शन क्लिक करा
 • e-KYC पर्याय वर क्लिक करा
 •  pmkisan असे आशयाचे पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा टाकून त्यांनतर सर्च करायचे आहे. 
 • यामध्ये तुम्हाला अणखीन एक पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे.
 • यानंतर Get OTP यावर क्लिक करायचे आहे. 
 • त्यानंतर तुमच्या मोबाईलवर 4 अंकी OTP नंबर येईल. तो OTP या बॉक्समध्ये टाकायचा आहे.
 • त्यानंतर Submit For Auth यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर वरती e-KYC is Success असा SMS येईल.


 KYC झाली का असे चेक करा मोबाईल वर 👇👇

 • सर्व प्रथम  Google वरुन https://pmkisan.gov.in/ या वेबसाईटवर जावे .
 •  होम पेज व आल्यावर Farmer Corner  ऑप्शन क्लिक करा
 • e-KYC पर्याय वर क्लिक करा
 •  pmkisan असे आशयाचे पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा टाकून त्यांनतर सर्च करायचे आहे. 

जर तुम्ही यापूर्वी केवायसी केली असेल तर तुम्हाला EKYC is  Already Done! असे समोर दिसेल


13 वा हप्ता कधी जमा होणार ?

पीएमकिसानचा 13 वा हप्ता 2000 रुपये जमा होण्यासाठी  सर्वांनी पीएमकिसान खात्याला आपले आधार कार्ड लिंक करणे म्हणजे ekyc करणे गरजेचे आहे. kyc करण्याची शेवट तारीख 31 जुलै 2022 आहे.

पीएम किसान योजना यादी 2022

पीएम किसान योजना 2022 ची यादी खाली दिलेली आहे या यादीत नाव असेल तरच तुम्हाला पुढील हप्ता म्हणजे 2000 मिळणार आहे. यादीत आपले नाव पाहू शकता. त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

पीएमकिसान लाभार्थी यादी पहा 👇👇

👉👉येथे क्लिक करा 👈👈

pmkisan 13th instalment

पीएम किसान सन्मान निधि योजना यामध्ये देशातील प्रत्येक शेतकर्‍याला शेतीची कामे करण्यासाठी सरकारकडून दर तीन महिन्याला 2000 प्रमाणे वर्षाला एकूण 6000 थेट बँक खात्यात दिले जातात. ही योजना 2018 साली सुरू झाली आहे. आतापर्यंत 12 हफ्ते जमा झाले असून लवकरच 13 वा हप्ता शेतकर्‍यांना मिळणार आहे. पुढील हप्त्याचे स्टेटस तुम्ही मोबाईल वर पाहू शकता. त्यासाठी खाली लिंक दिलेली आहे.

तुमच्या खात्याचे स्टेटस चेक करा 👇👇

👉👉 येथे क्लिक करा

योजनाचे नाव पीएमकिसान योजना 2022
वेबसाईटhttps://pmkisan.gov.in/
योजनेचे स्वरूपवार्षिक 6000 रुपये लाभ 
ekyclast date 31 july

Tags