Type Here to Get Search Results !

मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी 90% अनुदान, असा करा अर्ज

 मिनी ट्रॅक्टर साठी  ९० टक्के अनुदान

मिनी ट्रॅक्टर खरेदी साठी शासन देतय अनुदान.आता  मिनी ट्रॅक्टर घेण्यासाठी काहींना शासनाकडून ९० टक्के अनुदान मिळते. मिनी ट्रॅक्टर योजना अर्ज कुठे आणि कसा करावा, कोणत्या व्यक्ती यासाठी पात्र आहेत, ही माहिती आपण आज  जाणून घेणार आहोत. mini tractor subsidy scheme 2022मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी हे असतील पात्र  

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना या योजनेंतर्गत 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्या ट्रॅक्टरसाठी लागणारी इतर साहित्य पुरवठा  करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

केवळ अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील अर्जदार या योजनेसाठी अर्ज करू शकतील.

योजनाचे नाव मिनी ट्रॅक्टर  योजना 2022
वेबसाईटhttps://pmkisan.gov.in/
योजनेचे स्वरूप90% अनुदान ( कमाल रु. 3.15 लाख )
लाभार्थी कोणअनुसूचित जाती व नवबौध्द

मिनी ट्रॅक्टर  योजना अटी व नियम

  • स्वयंसहाय्यता बचत गटातीलअनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील नागरिक असावेत.
  • सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • बचत गटातील कमीत कमी 80% सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील असणे गरजेचे आहे.
  • मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी साठीअनुदान जास्तीत जास्त मर्यादा रु. 3.50 लाख इतकी असेल,
  • स्वयंसहाय्यता बचत गटांनी 10% स्वहिस्सा भरल्यानंतर 90% (कमाल रु. 3.15 लाख) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहिल.

ट्रॅक्टर अनुदान अर्ज असा करा

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा कसा करावा लागतो ते पाहूया.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या जिल्ह्याच्या समाज कल्याण कार्यालयास तुम्हाला भेट द्यायची आहे. या कार्यालयामध्ये तुम्ही ९० टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर खरेदी करू शकता.

अधिक माहितीसाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या 👇👇

      👉👉येथे क्लिक करा

Tags